Mumbai local : 'एआय'मुळे मुंबई लोकलमध्ये होणार बदल, 'या' सिस्टीमची होतेय चाचणी, 'हे' आहेत फायदे
Mumbai local train AI technology will be used : मुंबई लोकलची सेवा आता पहिल्यापेक्षा आणखी चांगली होणार आहे. एआय टेक्नॉलॉजीच्या मदतीने लोकल ट्रेन आता अधिक स्मार्ट करण्याचा प्रयत्न होत असून एक खास सिस्टीममुळे हे शक्य होणार आहे. ठाणे, दादर आणि कुर्ला आदी जास्त गर्दीच्या स्थानकावर यासंदर्भात प्रायोगिक चाचणी केली जात आहे.
जपान आणि अमेरिका येथील लोकल ट्रान्सपोर्ट अधिक नियोजनबद्ध आणि चांगली होण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, या तंत्रज्ञानामुळे रेल्वे स्टेशनवरील गर्दीचे व्यवस्थापन होण्यास मदत तिथे मिळत आहे. आता असाच प्रयोग मुंबई लोकलमध्ये सुद्धा होणार आहे. असे वनइंडिया हिंदीने वृत्त दिले आहे.

Photo - AI
मुंबई हे तसे पाहिले तर गजबजलेले शहर, मुंबई कधी न थांबणारे शहर म्हणून परिचित आहे. येथील लोकल तर मुंबईकरांचा श्वास.. मुंबईची जनवाहिनी असे लोकलला म्हटले जाते. रोज लोकलमधून जवळजवळ 70 लाख प्रवासी प्रवास करतात, पण एकीकडे गर्दी आणि दुसरीकडे मुंबईतील पाऊस यामुळे लोकल गाड्या लेट होण्याचे प्रमाण दिसून येते, त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आता हीच समस्या दूर करण्यासाठी मुंबई लोकलची प्रवास सुविधा अधिक सोईस्कर करण्याचा प्रयत्न होत आहे, यामुळे ज्या गाड्या विलंबाने धावतात आणि गर्दी यापासून काही प्रमाणात दिल्यास मिळू शकेल.
काय आहे ट्रॅफिक प्रेडिक्शन सिस्टिम?
प्राप्त माहितीनुसार एआय आधारित ट्रॅफिक प्रेडिक्शन सिस्टीम प्रायोगिक तत्त्वावर मुंबई लोकलमध्ये लागू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, या तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकल रेल्वेची टाइमिंग आणि गर्दी याचे आकलन होईल आणि स्मार्ट नियोजन करता येण्यास मदत मिळेल. प्राप्त माहितीनुसार एआय आधारित ट्रॅफिक प्रोडक्शन सिस्टीम एक इंटेलिजंट मॉडेल असून ते प्रवास, माहिती, हवामान सुट्ट्या, सण उत्सव यासंदर्भात वेध घेत माहिती देते. या सिस्टीममुळे कोणत्या वेळी कोणत्या स्टेशनवर किती गर्दी आहे तसेच रेल्वेचे शेड्युल आणि अन्य बाबी समजणार आहेत. प्लॅटफॉर्म असाइन्मेंट कोच, पोझिशनिंग, हे सुद्धा अवगत होऊ शकेल.
दादर, ठाण्यात चाचणी
मुंबई लोकलसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासात मोठे बदल अपेक्षित आहेत. रेल्वे बोर्ड यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करत आहे आणि मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही याला दुजोरा दिल्याचे वनइंडिया हिंदीच्या वृत्तात आहे. तसेत इंग्रजी वृत्तपत्रातील एका बातमीनुसार,वनइंडिया हिंदीने वृत्त दिले की, सध्या एआय मॉडेलची चाचणी दादर, ठाणे आणि कुर्ला यांसारख्या जास्त गर्दीच्या स्टेशनवर केली जात आहे. जर ही प्रणाली यशस्वी झाली, तर ती संपूर्ण मुंबई उपनगरीय नेटवर्कमध्ये लागू केली जाईल.
एआय (AI) मुळे मुंबई लोकलमध्ये कसा बदल होईल?
या तंत्रज्ञानामुळे खालील बदल पाहायला मिळतील:
ट्रेनची वारंवारता (Frequency): ज्या स्टेशनवर जास्त गर्दीचा अंदाज असेल, तिथे अतिरिक्त ट्रेनची व्यवस्था केली जाईल.
रिअल टाइम अलर्ट: प्रवाशांना मोबाइल ॲपद्वारे कोणत्या ट्रेनमध्ये कमी गर्दी आहे, याची माहिती मिळेल.
स्टेशन लोड डिस्ट्रिब्यूशन: स्टेशनवर जास्त गर्दी झाल्यास प्रवाशांना पर्यायी स्टेशन किंवा मार्ग सुचवला जाईल.












Click it and Unblock the Notifications