Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

AI News : अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी खुशखबर! गुगल जेमिनीचे 5 अद्भुत फीचर्स जे तुमचे काम करेल सोपे!

Google Gemini Android app : सद्याचा काळ हा एआयचा काळ मानला जात आहे. एआयमुळे आता अनेक कामे अतिशय सोपे व सहज होऊ लागले आहेत. आता एआय वापरकर्त्यांसाठी विशेष करून ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे, त्यासाठी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे.

जर तुम्ही अँड्रॉइड 10 (Android 10) किंवा त्यावरील आवृत्ती वापरत असाल, तर गुगल जेमिनी (Google Gemini) ॲप आता तुमच्या स्मार्टफोनमध्ये ॲक्सेस करणे खूप सोपे झाले आहे.

मात्र, जेमिनी केवळ एक सामान्य चॅटबॉट राहिलेला नाही. जेमिनी २.५ अपडेट नंतर यात अशी शक्तिशाली फीचर्स आली आहेत, ज्यामुळे तुमचा डिजिटल अनुभव पूर्णपणे बदलू शकतो. तुमच्या अँड्रॉइड फोनवर तुम्ही नक्कीच वापरून पाहाव्यात अशा गुगल जेमिनीच्या ५ अद्भुत फीचर्स, चला तर जाणून घेऊया त्याविषयी सविस्तर!

AI News

१. गुगल व्हेओ २ : टेक्स्टवरून व्हिडिओ तयार करण्याचा अद्भुत अनुभव (सशुल्क)

गुगल व्हेओ २ (Google Veo 2) हे एक क्रांतिकारी फीचर आहे, जे तुम्हाला केवळ टेक्स्ट प्रॉम्प्ट (Text Prompt) वापरून व्हिडिओ तयार करण्याची सुविधा देते.

कार्य

तुम्ही फक्त तुमच्या मनातील दृश्याचे वर्णन टाइप करा आणि जेमिनी तुमच्यासाठी ८ सेकंदांपर्यंतचा, ७२०p दर्जाचा व्हिडिओ जनरेट करेल.

लक्षात ठेवा

हे एक सशुल्क फीचर असून, ते जेमिनी ॲडव्हान्स्ड सबस्क्रिप्शन (साधारणपणे ₹१९५० प्रति महिना) सोबत उपलब्ध आहे.

२. डीप रिसर्च (Deep Research) : तुमचा पर्सनल रिसर्च असिस्टंट

एखाद्या विषयावर सखोल संशोधन (Deep Research) करायचे असेल, अनेक वेबसाइट्स ब्राउझ करायच्या असतील किंवा उत्पादनांची तुलना करायची असेल, तर हे फीचर तुमच्यासाठी उपयुक्त आहे.

मोफत सुविधा

जेमिनीच्या मोफत प्लॅनमध्ये तुम्हाला बेसिक डीप रिसर्चची सुविधा मिळते.

ॲडव्हान्स्ड सुविधा (Pro)

जेमिनी २.५ प्रो सबस्क्रिप्शनसह तुम्हाला ॲडव्हान्स्ड डीप रिसर्च अनलॉक करता येतो. हा असिस्टंट तुमच्यासाठी रिपोर्ट्स देखील तयार करू शकतो आणि तुमचा खास रिसर्च पार्टनर म्हणून काम करतो.

३. इमेजेस जनरेट करा : तुमच्या कल्पनाशक्तीला द्या वाव!

आता जेमिनी वापरून तुम्ही फक्त टेक्स्ट प्रॉम्प्टच्या आधारे कोणतीही इमेज तयार करू शकता.

उदाहरण: तुम्ही "डोंगरावर नाचणारा मोर" किंवा "तलावावर गिटार वाजवत असलेला बेडूक" असे टाइप केले तरी जेमिनी तुमच्या वर्णनानुसार इमेज जनरेट करेल.

उत्तम परिणाम

इमेज जनरेट करताना तुम्ही जेवढा तपशीलवार प्रॉम्प्ट द्याल, तेवढे चांगले परिणाम मिळतील. (लक्षात ठेवा, जेमिनी संवेदनशील किंवा प्रतिबंधित इमेजेस जनरेट करत नाही.)

४. पर्सनलायझेशन (Personalization): अधिक स्मार्ट आणि वैयक्तिकृत उत्तरे

जेमिनी ॲप आता अधिक स्मार्ट झाला आहे. तुमच्या परवानगीने ते तुमचा शोध इतिहास (Search History) आणि ॲप वापरण्याचा डेटा वापरून अधिक वैयक्तिकृत (Personalized) आणि तुमच्या संदर्भाशी संबंधित उत्तरे प्रदान करते.

फायदा: याचा अर्थ असा की जर तुम्ही वारंवार एखाद्या विषयाचा शोध घेतला, तर जेमिनी त्यानुसार तुम्हाला अधिक संबंधित आणि अचूक माहिती देईल.

५. जेमिनी २.५ प्रो सह कोडिंग सुरू करा : तुमचा कोडिंग पार्टनर

जर तुम्हाला कोडिंगमध्ये (Coding) रस असेल, तर जेमिनी २.५ प्रो हे एक गेम-चेंजर आहे. हे गुगलचे सर्वात प्रगत मॉडेल आहे, ज्यामध्ये मल्टीमॉडल (Multi-modal) वैशिष्ट्ये, दीर्घ-संदर्भ उत्तरे (दहा लाख टोकनपर्यंत) आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रगत वेब डेव्हलपमेंट कोड जनरेट करण्याची क्षमता आहे.

गुगल जेमिनी आता फक्त प्रश्न-उत्तरे देणारा चॅटबॉट नसून, एक स्मार्ट असिस्टंट, व्हिडिओ मेकर, इमेज जनरेटर आणि कोडिंग पार्टनर देखील आहे. जर तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असेल, तर हे ५ फीचर्स नक्की वापरून पहा!

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+