जेमिनी AI इमेज ट्रेंड "जो साडी घालू शकतो, तो ती काढूही शकतो!" फोटो तयार करणे धोकादायक? वाचा का..
Gemini Nano Banana Trend AI misuse : हल्ली सोशल मीडियावर AI वापरून फोटो तयार करण्याची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 'जेमिनी' (Gemini) सारख्या AI टूल्सच्या मदतीने तुम्ही तुमचे फोटो आकर्षक साडी लुकमध्ये किंवा कार्टून-शैलीतील कलाकृतींमध्ये बदलू शकता. पण, ही मजा तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. "जो जेमिनी साडी घालू शकतो, तो ती काढूही शकतो!" कारण, या ट्रेंड्समागे गंभीर सायबर गुन्हे आणि फसवणुकीचे मोठे धोके दडलेले आहेत.

खासगी आयुष्यासाठी आव्हान
तुमचा फोटो एकदा AI मध्ये गेला की, त्याचा गैरवापर करून 'डीपफेक' (Deepfake) तयार केले जाऊ शकतात, ज्यामुळे तुमची बदनामी होण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे AI ट्रेंड्स फक्त मनोरंजनासाठी नसून, तुमच्या खासगी आयुष्यासाठी एक आव्हान देखील आहेत. वेळीच हे धोके ओळखा आणि सावध राहा.
जेमीनी ट्रेंड आकर्षक पण आत दडले धोके
सध्या सोशल मीडियावर प्रत्येकजण AI ट्रेंड वापरून आपले फोटो एडिट करताना दिसत आहे. कोणी साडी लुकमध्ये फोटो बनवत आहे, तर कोणी 'घिबली-स्टाईल आर्ट' मध्ये स्वतःला बदलत आहे. हे ट्रेंड दिसायला खूप आकर्षक असले तरी, त्यांच्यामागे काही असे धोके लपलेले आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
AI चे 'हे' धोके
AI ची वाढती ताकद नवीन शक्यता निर्माण करत असली तरी, तिचा गैरवापर गंभीर समस्यांना जन्म देत आहे. 'डीपफेक', 'प्रायव्हसी लीक' आणि 'सायबर छळवणूक' यांसारखे धोके वाढत आहेत. नवीन AI इमेज जनरेटर्स (उदा. Stable Diffusion, Midjourney, DALL-E) इतके प्रगत झाले आहेत की ते अगदी खऱ्यासारख्या प्रतिमा तयार करू शकतात.
अश्लील प्रॉम्प्ट्स दिला तर..अवघड
जर कोणी चुकीचे किंवा अश्लील प्रॉम्प्ट्स (आदेश) दिले, तर AI त्याप्रमाणे प्रतिमा तयार करू शकतो. यामुळे, खोट्या आणि अश्लील प्रतिमा तयार करण्याचा ट्रेंड वाढत आहे. 'जेमिनी' (Gemini) च्या साडी ट्रेंडनंतर सोशल मीडियावर एक कोट व्हायरल होत आहे: "जो (जेमिनी) साडी घालू शकतो, तो ती काढूही शकतो."
डिपफेकचा धोका
एखाद्याची खोटी, अश्लील प्रतिमा तयार करणे हा एक गंभीर गुन्हा आहे आणि यासाठी कठोर शिक्षा होऊ शकते. जर तुमची खरी फोटो वापरून त्यात चुकीचे बदल केले, तर त्याला 'डीपफेक छळवणूक' म्हटले जाते, जे मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या खूप हानिकारक आहे. बहुतेक अधिकृत AI टूल्स असे कंटेंट थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण तरीही गैरवापर करणारे लोक मार्ग शोधतात. त्यामुळे AI ट्रेंड वापरताना खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.












Click it and Unblock the Notifications