AI Video Creation: एआयच्या मदतीने बनवा व्हिडीओ आणि कमवा पैसे; कॅमेरा किंवा स्टुडिओची गरज नाही
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने आता अनेक गोष्टी अत्यंत सुलभ झाल्या आहेत. व्हिडीओ एडिटिंग हे काम आता एआयच्या सहाय्याने खूपच सोपं आणि जलद झालं आहे. अगदी मोफत स्किल्स शिकून, घरबसल्या तुम्ही व्हिडीओ तयार करून चांगली कमाई देखील करू शकता.

जर तुम्हाला व्हिडीओ बनवण्याची आवड असेल, पण तुमच्याकडे महागडा कॅमेरा किंवा स्टुडिओ नसेल, तरीही आता काळजीचं कारण नाही. AI च्या सहाय्याने तुम्ही कोणत्याही प्रोफेशनल सेटअपशिवाय दर्जेदार व्हिडीओ तयार करू शकता आणि त्यांचं संपादनही सहज करता येतं.
AI Generated Video ला मिळते चांगली पोहोच
AI टूल्समुळे व्हिडीओ बनवणं जितकं सोपं आहे, तितकंच एडिटिंगही आता सोपं झालं आहे. विशेषतः जे विद्यार्थी किंवा प्रोफेशनल पार्ट-टाईम काम करत आहेत आणि एडिटिंगसारख्या कौशल्यांचा वापर करून पैसे कमवू इच्छितात, त्यांच्यासाठी AI एक उत्तम पर्याय आहे. काही AI टूल्स मोबाइल-फ्रेंडली आहेत आणि त्यामुळे प्रवासातसुद्धा सहज एडिटिंग करता येतं.
AI Video Creation: काही उत्कृष्ट टूल्स
Synthesia.io
यामध्ये तुम्ही अवतारच्या सहाय्याने व्हिडीओ जनरेट करू शकता.
120 हून अधिक भाषांमध्ये ऑटोमेटेड वॉईसओव्हरची सुविधा आहे.
कॅमेराची गरज लागत नाही.
Pictory.ai
ब्लॉग किंवा लेखांपासून थेट व्हिडीओ तयार करता येतो.
ऑटो सबटायटल्स आणि सोशल मीडियासाठी छोटे व्हिडीओ तयार करण्यात उपयुक्त.
Lumen5
टेक्स्टला स्लाइडशो व्हिडीओमध्ये रूपांतरित करू शकता.
यूट्यूब आणि इन्स्टाग्राम रील्ससाठी खूप वापरलं जातं.
InVideo
कस्टम टेम्पलेट्स, AI-जनरेटेड स्क्रिप्ट, मार्केटिंग व एज्युकेशनल व्हिडीओसाठी योग्य.
खासकरून शॉर्ट्ससाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
AI च्या मदतीने व्हिडीओ एडिट करून कमवा पैसे
AI वापरून व्हिडीओ एडिटिंग करून तुम्ही इन्फ्लुएंसर, यूट्यूबर, व्लॉगर यांच्यासाठी काम करू शकता आणि त्याबदल्यात चांगली पेमेंट मिळवू शकता. आजकाल Instagram, Facebook सुद्धा क्रिएटर्सना पेमेंट करत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर व्हिडीओ टाकून तुम्ही कमाई करू शकता.
तुमचा स्वतःचा यूट्यूब चॅनल सुरू करून, मोनेटायझेशननंतर त्यावरूनही तुम्ही उत्पन्न मिळवू शकता. थोडक्यात, एआयच्या सहाय्याने व्हिडीओ क्रिएशन आणि एडिटिंग आता नोकरी किंवा व्यवसायाचा एक नवा आणि मोठा पर्याय ठरू शकतो.












Click it and Unblock the Notifications